khabarbat

It is necessary to take oath on 24th November and form the cabinet by 25th in Maharashtra (India). If that does not happen, the possibility of President's rule in the state cannot be ruled out.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

महाराष्ट्रात सरकार स्थापण्यासाठी अवघे दोन दिवस; राष्ट्रपती राजवटीची चाहूल

 

नवी दिल्ली : khabarbat News Network
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी लागणार आहे. राज्यात महायुतीला बहुमताचा आकडा गाठता येईल असे दिसत असले तरी महाविकास आघाडी काट्याची टक्कर देईल असा दावा करण्यात येत आहे.

महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता बारगळणार आहे. पण जर काँटे की टक्कर झाली आणि अपक्षांचे पारडे जड झाले तर सत्ता स्थापन करण्यासाठी अवघे दोन दिवस हाताशी राहिले आहेत. त्यामुळे २४ नोव्हेंबरला शपथविधी आणि २५ तारखेपर्यंत मंत्रिमंडळ गठित करणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर राज्यात (President Rule) राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, एक्झिट पोलच्या (exit poll maharashtra 2024) आकडेवारीनुसार, अपक्ष आणि बंडखोर उमेदवार या निवडणुकीत किंगमेकर (kingmaker) ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांकडून बंडखोरांना आश्रय देण्यास सुरुवात झाली आहे. निकालानंतर जर त्रिशंकु परिस्थिती उद्धभवल्यास काय होईल, यावर घटना तज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या मते, २३ तारखेच्या निकालानंतर राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. ज्या गटाकडे बहुमत असणार त्यांना बहुमताचे पत्र राज्यपालांना द्यावे लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

घटनेनुसार सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून राज्यपालांना बोलावता येत नाही, असे बापट यांनी सांगितले. २६ तारखेच्या आत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. विधानसभेला मुदत वाढ देता येत नाही. तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी लागते.

शिंदेंचा शर्ट पकडून जाणार : संजय शिरसाट
महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळी समीकरणं चर्चेत आली आहेत. मुख्यमंत्री (eknath shinde) एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) हे एकत्र येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनीही अशा प्रकारचं विधान केलं होतं. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी देखील असेच सूचक विधान केलं आहे. एकनाथ शिंदेसाहेब योग्य दिशेने जात असतात. आम्ही त्यांचा शर्ट पकडून जाऊ, अस संजय शिरसाट म्हणाले.

भाजप बंडखोरांच्या संपर्कात
एक्झिट पोलनंतर भारतीय जनता पक्ष आता अ‍ॅक्शन मोडवर आला आहे. जिंकण्याची शक्यता असणा-या बंडखोरांशी भाजप (BJP) नेत्यांचा संपर्क सुरू आहे. दरम्यान, भाजप विजयी बंडखोरांवरील कारवाई मागे घेणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. ही जबाबदारी त्या-त्या विभागातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर टाकण्यात आली आहे. दरम्यान, समोर आलेल्या विविध संस्थाच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीचे सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »