khabarbat

Do you want to come to the village every day and take your kisses? This statement was made by Bhimrao Keram. Interestingly, Pankaja Munde was present on the platform this time.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

भिमराव केराम का म्हणाले, ‘गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे का?’

नांदेड : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. प्रत्येक उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून गावभेटी, सभा, रोड शो, दारोदार जाऊन प्रचार केला जात आहे. त्यातून आरोप प्रत्यारोप होतच आहेत. गेल्या पाच वर्षात काय केलं आणि पुढील पाच वर्षात काय करणार याची आश्वासन दिले जात आहेत. तर काही उमेदवारांना जनतेच्या नाराजीला सामोरं जावं लागत आहे. त्या पैकीच एक आहेत किनवटचे विद्यमान आमदार भिमराव केराम. आमदार साहेब गावात येत नाहीत, अशी भर सभेत लोकांनी तक्रार बोलून दाखविल्यावर भिमराव केराम यांनी जे एक वक्तव्य केलं, त्याची चर्चा सध्या मतदार संघात होत आहे.

भाजपने नांदेड जिल्ह्यातील किनवट मतदार संघातून विद्यमान आमदार भिमराव केराम यांना उमेदवारी दिली. सध्या त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. शिवाय पंकजा मुंडे ही त्यांच्या प्रचारासाठी आल्या. त्यावेळी गावातल्या लोकांनी आमदार साहेब गावात येत नाहीत असे म्हटले. त्यावर रोज-रोज गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे का? असे वक्तव्य भिमराव केराम यांनी केले. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे उपस्थित होत्या.

भिमराव केराम यांच्या प्रचारासाठी बोधडी येथे पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. केराम गावात फिरकले नाहीत, अशी ओरड होत आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »