पुणे : khabarbat News Network
वडगाव शेरीला महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. शुक्रवारी सुनील टिंगरेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना सज्जड दम भरला.
अजित पवार म्हणाले, आपण नीट वागलो तर आपल्याला दोन आमदार मिळणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी एकजीवाने काम करा. तुम्ही एका आमदार आम्हाला आणून द्या आणि हक्काने सांगा आता महायुतीचा दुसरा जगदीश मुळीक आमदार द्या. आपण गाफील राहू नका. आज इथं दडपशाही सुरु आहे. इथं दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय.
हे पण वाचा… अजित पवार का म्हणाले, कॉम्प्रोमाईज करणारा माणूस पुढे यशस्वी होतो!
वडगाव शेरीत आमचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत. त्यांना फोन केला जातो की, तुझ्याकडे बघून घेईल. अरे, आम्ही काय हातात बांगड्या भरल्या आहेत का? मी जो पर्यंत सरळ तोपर्यंत सरळ आहे. ‘अरे ला कारे’ म्हणण्याचीही आमची ताकद आहे. जे काय धमकी देत आहेत. त्यांना आमदारकीचा चेहरा मी दाखवला आहे. त्यांची सगळ्याची अंडी पिल्ली माझ्याकडे आहेत, असे अजित पवार यांनी ठणकावले.