khabarbat

A woman became a millionaire by selling her own sweat! She charges 43 lakh 67 thousand rupees for a bottle of sweat.

Advertisement

sell sweat be millionaire | स्वत:चा घाम विकून महिला बनली करोडपती!

डर्बीशायर । khabarbat News Network
सामान्यपणे मेहनतीने कमावलेल्या पैशांना घामाची कमाई असे म्हटले जाते. प्रत्यक्षात कुणीही आपला घाम विकून पैसे कमावलेले नसतात. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एक महिला चक्क तिचा घाम (sweat) विकून करोडपती बनली आहे. अमेरिकेच्या मॅटलॉक, डर्बीशायर (Derbyshire) मध्ये राहणा-या महिलेबाबतही हेच सांगता येईल. ही महिला आधी एका कॉफी शॉपमध्ये नोकरी करत होती. पण आता या महिलेने नोकरी सोडून स्वत:चा घाम ऑनलाईन विकणे सुरू केले आहे.

एलेक्सिया ग्रेस (ALEXIA GRACE) असे या २५ वर्षीय महिलेचे नाव आहे. एलेक्सियाने सांगितले की, ती आधी बरिस्ता कॉफी शॉपमध्ये नोकरी करत होती. तिने एक अजब बिझनेस सुरू केला. तो म्हणजे स्वत:चा घाम विकणे. एलेक्सियाने सांगितले की, नोकरी सोडल्यानंतर ओन्लीफॅन्स जॉईन केले.सुरूवातीला जास्त पैसे मिळत नव्हते. मग तिने घाम विकणे सुरू केले. घामाच्या एका बॉटलसाठी ती ४३ लाख ६७ हजार रूपये घेते.

एलेक्सियाने हेही सांगितले की, तिचे फॅन्स तिला लाखो रूपयांचे गिफ्टही देतात. नुकतीच तिने एक BMW कार खरेदी केली. याआधी तिने एक Mercedes कार खरेदी केली होती. एका फॅन्सने तिला कार घेण्यासाठी ६४ लाख रूपये पाठवले होते. या बिझनेसमधून ती वर्षाला १ कोटी ३१ लाख रूपये कमाई करू लागली.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »