आनंद : News Network
‘अमूल’ आपल्या दुधाच्या ब्रॅँडचा जगभर झेंडा रोवत निघाला आहे. चालू वर्षीच्या मार्च महिन्यापासून अमूलचे दूध अमेरिकेत उपलब्ध झाले. अमूल मिल्कने देशाबाहेर पाऊल ठेवण्याची ही पहिलीच वेळ होती. अमेरिकेपाठोपाठ आता युरोपमध्येही अमूलचे दूध उपलब्ध होत आहे.
वाचा हटके बातमी : मोराने घेतली चक्क ६,५०० फुटांवर भरारी!
भारतीय अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसाय क्षेत्राचे योगदान ५ टक्के आहे. सुमारे ८ कोटी शेतकरी या व्यवसायाशी निगडीत आहेत. पुढील ५ वर्षांत देशातील दुग्धव्यवसायात १५ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येईल.
मार्च २०२४ ला संपलेल्या आर्थिक वर्षात अमुलची वार्षिक उलाढाल सुमारे ८० हजार कोटी रुपये होती. अमूलचे देशभरात १०७ डेअरी प्लांट आहेत. ब्रँड ५० हून अधिक उत्पादने विकतो. दररोज ३१० लाख लिटर दूधाचे अमुल शेतक-यांकडून संकलन करतो. देशभरात दरवर्षी अमूलची सुमारे २२ अब्ज पॅकेट विकली जातात. ३५ लाखांहून अधिक शेतकरी या अमुलशी थेट जोडले गेले आहेत.
‘Amul’ is planting its brand of milk all over the world. Amul milk became available in America from March this year. This was the first time that Amul Milk stepped outside the country. After America, Amul milk is now available in Europe as well.