महागाई रोखण्यासाठी ‘जीएसटी’ कपात
नवी दिल्ली । khabarbat News Network
वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून औषधे आणि ट्रॅक्टर तसेच अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दर ५% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, सिमेंटसारख्या काही उत्पादनांवरील करात कोणताही बदल होणार नाही. सध्या ट्रॅक्टरवर त्यांच्या श्रेणीनुसार १२% किंवा २८% जीएसटी लागू आहे.
ट्रॅक्टरवरील जीएसटी कमी केल्यामुळे होणा-या संभाव्य महसुली तोट्यात समतोल राखण्यासाठी ४० लाखांपेक्षा जास्त किंमत असलेल्या हाय-एंड इलेक्ट्रिक वाहनांवर जीएसटी वाढवायचा की नाही यावर जीएसटी रेट रॅशनलायझेशन पॅनेल चर्चा करत आहे. सध्या या ईव्हींवर ५% जीएसटी आहे.
आरोग्य आणि मुदतीच्या विम्यावरील जीएसटीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. आरोग्य विम्यावरील जीएसटी १२% पर्यंत कमी करण्याचे सुचवले आहे, तर मुदतीच्या विम्यावर ५% कर लागण्याची शक्यता आहे. काही सूचनांमध्ये मुदत विमा ‘शून्य’ दर श्रेणीमध्ये ठेवण्याचा देखील समावेश आहे. टर्म इन्शुरन्ससाठी ५% जीएसटी अधिक असण्याची शक्यता दिसते.
हे देखील वाचा : भारत अंतराळात military base बनविणार
To control rising inflation, the central government has proposed to reduce the GST rate on many essential items like medicines and tractors to 5%. However, there will be no change in tax on certain products like cement.