टोकियो | khabarbat News Network
Bomb Explosion at Japan Airport : जपानमधील विमानतळावर एका अमेरिकी बॉम्बचा अचानक स्फोट झाला. स्फोटामुळे विमानतळाच्या टॅक्सी-वेवर मोठा खड्डा पडला. यामुळे येथे ८० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. दक्षिण-पश्चिम जपानमधील मियाझाकी विमानतळावर बॉम्बस्फोट झाला.
सेल्फ डिफेन्स फोर्सेस आणि पोलिसांनी केलेल्या तपासात असे दिसून आले की हा स्फोट ५०० पौंड वजनाच्या अमेरिकन बॉम्बमुळे झाला. मात्र, या घटनेतून सध्या कोणालाही कोणताही धोका नाही.
एव्हिएशन स्कूलमधून रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये हा अपघात दिसत आहे. स्फोटामुळे डांबराचे तुकडे कारंज्याप्रमाणे हवेत उडाल्याचेही दिसले. जपानी मीडियानुसार, प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये टॅक्सी-वेमध्ये खोल खड्डा दिसत आहे. त्यानंतर लगेचच जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी यांनी सांगितले की, विमानतळावरील उड्डाणे एका दिवसाच्या अंतराने पुन्हा सुरू होतील.