हैदराबाद : khabarbat News Network
Liquor will be available for Rs 99 : मद्य प्रेमींसाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. आता फक्त ९९ रुपयांमध्ये दारुचा कोणताही ब्रँड मिळणार आहे. याबाबतची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. हे धोरण १२ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. याशिवाय राज्यात ३७३६ दारुची दुकानेही उघडली जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू सरकारने ९९ रुपयांमध्ये दारु देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारची ५५०० कोटी रुपयांची कमाई होणार आहे.
उत्पादन शुल्क धोरणाची अधिसूचना जारी करताना, राज्य सरकारने दावा केला की, ते हरियाणासारख्या राज्यांपासून प्रेरणा घेऊन तयार केले गेले आहे. आता राज्यात दारुची दुकाने खाजगी झाली आहेत. गेल्या पाच वर्षांपासून राज्यात दारूची विक्री कमी होत आहे. आता त्यात वाढ होऊन राज्य देशातील टॉप ३ बाजारपेठांमध्ये सामील होऊ शकेल, अशी सरकारला आशा आहे. नवीन उत्पादन शुल्क धोरण सध्या दोन वर्षांसाठी लागू करण्यात आले आहे.
Now you can get any brand of liquor for just Rs.99. The Chandrababu Naidu government in Andhra Pradesh has decided to provide liquor at Rs. This will earn the government 5500 crore rupees.