मुंबई | khabarbat News Network
Hike in crude oil : पश्चिम आशियात इस्त्रायल-इराणमध्ये भडकलेल्या युद्धाचा परिणाम भारतासह जगभरात दिसण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. एकाच दिवसात कच्च्या तेलाच्या किमतीत ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचा फटका भारताला बसणार असून पेट्रोल (petrol) आणि (Diesel) डिझेलच्या दराचा भडका उडण्याची शक्यता आहे.
पश्चिम आशियातील या घटनेचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार असून मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. इराण हा कच्च्या तेलाचा जगातील एक प्रमुख निर्यातदार देश आहे. भारतामध्ये आयात करण्यात येणा-या कच्च्या तेलामध्ये इराणचा वाटा मोठा आहे. इस्रायल-लेबनॉन-इराण हा संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. याचा मोठा आर्थिक परिणाम जगाला भोगावा लागणार आहे.
The consequences of the Israel-Iran war in West Asia are becoming evident all over the world, including India. Crude oil prices have increased by 5 percent in a single day.