khabarbat

Mossad has foiled many plans of Hamas, Hezbollah and Iran. It is now being claimed that Mossad got away with 1,00,000 highly confidential nuclear documents of Iran.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

इराणी अणू कार्यक्रमाचे १ लाख डॉक्युमेंट MOSSAD च्या हाती!

जेरुसलेम | इस्रायलची मोसाद ही जगप्रसिद्ध गुप्तचर संस्था आहे. गाझामध्ये हमास असो, लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह असो अथवा इराण असो; इस्रायली गुप्तचर संस्थेचे डावपेच नेहमीच वरचढ ठरले आहेत. महत्वाचे म्हणजे, या संस्थेने यापूर्वीही, हमास, हिजबुल्लाह आणि इराणचे अनेक प्लॅन फ्लॉप केले आहेत. यातच आता मोसाद इराणचे १ लाख अत्यंत गोपनिय न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन भूर्र झाल्याचा दावा केला जात आहे.

Mossad has foiled many plans of Hamas, Hezbollah and Iran. It is now being claimed that Mossad got away with 1,00,000 highly confidential nuclear documents of Iran.

इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांनी ‘सीएनएन’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, इराणने एक गुप्तचर युनिट तयार केले होते. जिचा हेड नंतर एक इस्रायली एजन्ट निघाला. एवढेच नाही तर, युनिटच्या हेड शिवाय डिव्हीजनचे आणखी २० लोकही इस्रायली एजन्सी मोसादचे एजन्ट आढळले.

इराण न्यूक्लिअर संपन्न देश होणे इस्रायलच्या दृष्टीने घातक आहे. यासंदर्भात बोलताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी २०१८ मध्ये मोठा खुलासा केला होता. या ऑपरेशनमध्ये मोसादचे एजन्ट्स तेहरानच्या एका सीक्रेट गोदामात शिरले होते आणि सहा तासांच्या ऑपरेशनमध्ये तिजोरी तोडून १,००,००० हून अधिक डॉक्यूमेन्ट्स सोबत घेऊन गेले होते.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »