khabarbat

Udaynidhi Maran will be deputy chief minister of Tamilnadu.

Advertisement

Reshuffle in Tamilnadu | वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री!

khabarbat News Network

चेन्नई | तामिळनाडूच्या द्रविड मु्न्नेत्र कझगम सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मंत्रिमंडळात कोणत्या विभागात बदल होणार हे स्पष्ट नाही, परंतु मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा मुलगा आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

Chennai | Dravida Munnetra Kazhagam government of Tamil Nadu is likely to undergo major reshuffle. Chief Minister M.K. Udayanidhi Stalin, son of Stalin and a minister in the state government, is likely to get a bigger responsibility in the government. Chief Minister M. K. Stalin has hinted to make Sports Minister Udhayanidhi Stalin Deputy Chief Minister.

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी क्रिडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचे संकेत दिले आहेत. पत्रकारांनी स्टॅलिन यांना मंत्रिमंडळात फेरबदल आणि काही काळासाठी उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री बनवण्याच्या चर्चांवर प्रश्न विचारला. त्यावेळी कुठलीही निराशा नाही, बदल होईल असं उत्तर दिले. अमेरिकन दौ-यावरून परतल्यानंतर स्टॅलिन यांनी मंत्रिमंडळातील फेरबदलावर भाष्य केले आहे. आतापर्यंत २ वेळा स्टॅलिन मंत्रिमंडळ फेरबदलावर बोलले आहेत.

अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कझगमच्या विजयाचं श्रेय उदयनिधी यांना देण्यात आले. पक्षाच्या मोठ्या विजयात उदयनिधी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. उदयनिधी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी येत्या काळात त्यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळवायचा आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »