khabarbat

maharatna companies devidend

Advertisement

‘महारत्न’ कंपन्यांनी भरली सरकारची झोळी, दिला हजारो कोटींचा डिविडेंड Maharatna

 

नवी दिल्ली | khabarbat News Network
Maharatna Devidend : जून तिमाहीत लाभांश जाहीर करणा-या कंपन्यांकडून आता तो सरकारला दिला जात आहे. दीपमनं दिलेल्या माहितीनुसार ‘एनटीपीसी’ अर्थात नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने लाभांश म्हणून सरकारी तिजोरीत १६१० कोटी रुपये जमा केले आहेत. याशिवाय कोल इंडियाने सरकारी तिजोरीत लाभांश म्हणून १९४५ कोटी रुपये दिले आहेत. दोन्ही कंपन्यांनी मिळून ३५५५ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा केले.

It is now being paid to the government by companies declaring dividend in the June quarter. According to the information provided by Deepam, ‘NTPC’ i.e. National Thermal Power Corporation has deposited Rs 1610 crores in the government treasury as dividend. Apart from this, Coal India has paid Rs.1945 crore as dividend to the government exchequer. Both the companies together contributed Rs 3555 crore to the exchequer.

‘एनटीपीसी’चा डिविडेंड यील्ड २% आहे. म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने ‘एनटीपीसी’च्या शेअरमध्ये १० हजार गुंतवले तर त्याला एका वर्षात डिविडेंडच्या रुपात २०० रुपयांच्या जवळपास मिळतील. याचा डिविडेंड पे आऊट रेश्यो ३९.५% आहे. म्हणजे कंपनी आपल्या नफ्याच्या ४० टक्के डिविडेंडच्या रुपात शेअर होल्डर्समध्ये वाटते.

‘कोल इंडिया’चा डिविडेंड यील्ड ५.२५% आहे. याचाच अर्थ जर एखाद्याने या स्टॉकमध्ये १० हजार गुंतवले असतील तर त्याला प्रत्येक वर्षी डिविडेंडच्या रुपात ५२५ रुपयांच्या जवळपास मिळतील.

दीपमने दिलेल्या माहितीनुसार, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशननेही सरकारी तिजोरीत १३१३ कोटी रुपये जमा केले आहेत. यापूर्वी ‘पीएफसी’ म्हणजेच पॉवर फायनान्स कंपनीने ६०१ कोटी रुपये, कॉनकॉरने ६८ कोटी रुपये आणि राइट्स लिमिटेडकडून ४३ कोटी रुपये लाभांश म्हणून देण्यात आले होते.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »