– ३ दिवसात अनुदान शेतक-यांच्या खात्यावर
– हमीभावाने सोयाबीन खरेदीस मान्यता
khabarbat News Network
The central government has approved setting up of Soybean procurement centers in two states of Maharashtra and Karnataka with a minimum guaranteed price of 90 days. The state government has made a subsidy of Rs 4200 crore available and in the next two-three days this subsidy will be directly distributed to the farmers’ accounts.
बीड | कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन आणि उडीद ही दोन पिके ९० दिवसांसाठी हमीभावाने खरेदी केली जातील. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळीत आले होते. तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती, तसेच दिल्ली येथे भेटूनही याबाबत पाठपुरावा केला होता. अखेर या मागणीला मान्यता मिळाली आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली असून, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांसह वेळोवेळी पाठपुरावा केला.
राज्य शासनाच्या वतीने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतक-यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. यासाठी राज्य सरकारने ४२०० कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले असून येत्या दोन-तीन दिवसात या अनुदानाचे थेट वितरण शेतक-यांच्या खात्यावर करण्यात येणार आहे.