khabarbat

Advertisement

food scarcity in Namibia | १०० वर्षात पहिल्यांदाच नामिबियाची अन्नान्न दशा!

The Namibian government has ordered the killing of more than 700 wild animals, including elephants and hippos, to feed the people. Besides elephants, the country plans to kill 300 zebra, 30 hippos, 50 impala, 60 buffalo, 100 blue wildebeest and 100 eland.

७० हत्ती, ३०० झेब्रा, पाणघोड्यांसह ७०० प्राणी मारणार
३ कोटी जनतेची उपासमार, पिण्यासाठी पाणी नाही…
८४ कोटी अन्न संसाधने संपुष्टात, धान्याची गोदामे रिकामी
१५७ प्राण्यांची आतापर्यंत शिकार, ५६,८०० किलो मांस वाटप

विंडहोक । दक्षिण आफ्रिकी देश नामिबिया सध्या गेल्या १०० वर्षांच्या इतिहासातील सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील नागरिकांना दोन वेळचे अन्न मिळणेही अवघड झाले आहे. पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे, आता नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी येथील सरकारने काही प्राणी मारण्याचा निर्णय घेतला आहे.

आता नामिबिया सरकारने लोकांची भूक भागविण्यासाठी हत्ती आणि पाणघोड्यांसह ७०० हून अधिक वन्य प्राण्यांना मारण्याचे आदेश दिले आहेत. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेतील बहुतांश भाग दुष्काळाने त्रस्त आहे. संपूर्ण प्रदेशात ३ कोटी पेक्षाही अधिक लोक प्रभावित झाले असल्याचे युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्रामने जूनमध्ये म्हटले होते.

हत्तींशिवाय, ३०० झेब्रा, ३० पाणघोडे, ५० इम्पाला, ६० म्हशी, १०० ब्लू वाइल्डबीस्ट आणि १०० एलँड मारण्याची देशाची योजना आहे. तसेच, नामिबियातील ८४ टक्के अन्न संसाधने आधीच संपली आहेत, असे संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी गेल्या आठवड्यातच म्हटले होते.

५६,८०० किलो मांस सरकारला मिळालं!
नामिबियाच्या पर्यावरण, वनीकरण आणि पर्यटन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे प्राणी राष्ट्रीय उद्याने आणि अशा भागातून येतील जेथे त्यांची संख्या अधिक आहे. या प्राण्यांना व्यावसायिक शिका-यांकडून मारले जाईल. काही कंपन्यांना कंत्राटही देण्यात आली आहेत. आतापर्यंत १५७ प्राण्यांची शिकार करण्यात आली असून यातून सरकारला ५६,८०० किलोपेक्षा अधिक मांस मिळाले आहे. हे मांस लोकांमध्ये वितरित केले जात आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »