khabarbat

Advertisement

Isreal- Hijbullah attack | हिजबुल्लाह-इस्रायलमध्ये तुफानी रॉकेट हल्ले

– इस्रायलवर ३२० रॉकेट्सचा मारा, ११ लष्करी तळांवर हल्ले
– हिजबुल्लाहच्या १०० ठिकाणांवर इस्रायलचा हल्ला

बैरूत : लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने इस्रायलवर मोठा ड्रोन आणि रॉकेट हल्ला केला. गेले दोन दिवस इस्रायलने हिजबुल्लास लक्ष्य करत लेबनॉनमधील अनेक भागांवर हल्ले केले होते. इस्रायलवरील हल्ल्यानंतर लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाने म्हटले आहे की त्यांनी बैरूतमध्ये मारल्या गेलेल्या कमांडर फुआद शुकरच्या हत्येचा बदला घेतला आहे. या हल्ल्यात इस्रायलच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे हिजबुल्लाहने म्हटले आहे.

दरम्यान, इस्राइलच्या लष्कराने लेबेनॉनमधील इराणचे समर्थन असलेल्या हिजबुल्लाह या संघटनेच्या ठिकाणांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान हिजबुल्लाहच्या १०० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. लेबेनॉनने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्राइलकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आता या हल्यांदरम्यान, इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सुरक्षा कॅबिनेटची बैठक बोलावली आहे.

हिजबुल्लाहने इस्रायलवर ३२० क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले. अल जजीराच्या वृत्तानुसार, इराण समर्थित संघटना हिजबुल्लाहने रविवारी ११ इस्रायली लष्करी तळांवर ३२० कात्युशा रॉकेट डागल्याचे सांगितले. हिजबुल्लाने आपला टॉप कमांडर फुआद शुकर याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केला. ३० जुलै रोजी इस्रायलच्या बेरूतमधील हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा टॉप कमांडर मारला गेला होता.

दुसरीकडे, हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलांट यांनी आणीबाणी जाहीर केली. राजधानी तेल अवीवमधील बेन गुरियन विमानतळ बंद करून सर्व येणारी आणि जाणारी विमानसेवा ९० मिनिटांसाठी थांबवण्यात आली. मात्र, नंतर विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली. लेबनॉन आणि इस्रायल यांच्यातील हे हल्ले अशा वेळी झाले आहेत, जिथे दुसरीकडे इजिप्तमध्ये गाझात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी बैठक सुरू आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »