khabarbat

Donald Trump narrowly escaped the attack and the bullet licked his ear. If the bullet had missed by 2 centimeters, Trump would have lost his life.

Advertisement

Trump escaped from firing : २ से.मी. वरून सटकला मृत्यू, आणि ट्रम्प बचावले!

 

पेनसिल्व्हेनिया : निवडणूक रॅलीदरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रम्प पेनसिल्व्हेनियामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रॅली घेत असताना अचानक गोळीबार सुरू झाला. या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आणि गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली. जर गोळी २ सेंटीमीटर अलिकडून गेली असती तर ट्रम्प यांना आपला जीव गमवावा लागला असता.

हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, त्यांच्या कानातून गोळी गेल्यासारखे वाटले. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या कानांवर रक्त दिसत आहे. गोळी झाडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प स्वत:चा बचाव करण्यासाठी खाली वाकले, मात्र गोळी केवळ त्यांच्या कानाला लागली आणि ते थोडक्यात बचावले.

Former US President Donald Trump was holding a rally in Pennsylvania when the shooting suddenly started. He narrowly escaped the attack and the bullet licked his ear. If the bullet had missed by 2 centimeters, Trump would have lost his life.

Thomas Matthew Crooks, who shot Donald Trump, released a video of himself before the attack, in which he also explained the reason for the attack. “We hate the Republican Party, we hate Donald Trump,” Thomas said in the video. From this, it is being speculated that Thomas attacked Donald Trump out of hatred.

या गोळीबारात ट्रम्प जखमी झाल्याचेही वृत्त आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बंदुकीचा आवाज येताच ट्रम्प उजव्या हाताने आपला उजवा कान धरतात, नंतर ते पाहण्यासाठी हात खाली करतात आणि त्यानंतर ते व्यासपीठाच्या मागे गुडघे टेकून बसतात व अमेरिकन सीक्रेट सर्व्हिस एजंटचा एका गट त्यांना कव्हर करतो. यावेळी ट्रम्प यांच्या कानातून रक्त येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

आपल्या देशात असे घडू शकते यावर विश्वास बसत नाही. गोळीबार करणा-या व्यक्तीबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही, जो आता मृत्यूमुखी पडला आहे. माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागली होती. ते मला लगेच कळले. काहीतरी गडबड होते असल्याची मला त्यावेशी शंका आली होती कारण मला मोठा आवाज ऐकू येत होता, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

Trump’s assassination attempt : ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न फसला; मारेकरी मॅथ्यू गोळीबारात ठार

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्विट केले की, आपल्या लोकशाहीत राजकीय हिंसेला जागा नाही. नेमके काय झाले हे अद्याप आम्हाला माहीत नसले तरी, माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरक्षित आहेत आणि त्यांना गंभीर दुखापत झाली नाही त्यामुळे चिंतेचे कारण नाही.

ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर जगभरातील सर्व नेते त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. यासोबतच त्यांनी ट्रम्प यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

द्वेषापोटी केला गोळीबार

"We hate the Republican Party, we hate Donald Trump," Thomas said in the video.
Thomas Matthew Crooks

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणा-या थॉमस मॅथ्यू क्रूक्सने हल्ला करण्यापूर्वी स्वत:च एक व्हिडिओ प्रसृत केला होता आणि यात त्याने हल्ल्याचे कारणही सांगितले होते. व्हिडिओमध्ये थॉमसने म्हटले आहे, आपण रिपब्लिकन पक्षाचा द्वेष करतो, आपण डोनाल्ड ट्रम्पचा द्वेष करतो. यावरून थॉमसने द्वेषापोटीच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला केला होता, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »