London : UK मध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत मजूर पक्षाने ४१२ जास्त जागा मिळवल्या. ऋषी सुनक यांच्या सत्तारूढ हुजूर (Conservative Party) पक्षाला फक्त १२१ जागा जिंकता आल्या. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना या पराभवानंतर पंतप्रधानपद सोडावे लागले, तर मजूर पक्षाचे (Labour Party) नेते कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली.
Indian origin Shivani Raja sworn in as an MP in the UK, She took the oath of parliament with the Bhagavad Gita.
या निवडणुकीत भारतीय वंशाच्या शिवानी (Shivani Raja) राजा यांनी UK मधील लीसेस्टर पूर्वमधून मोठा विजय मिळवत त्या खासदार झाल्या आहेत. शिवानी राजा यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यांचा हा शपथ घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवानी राजा यांनी खासदार म्हणून शपथ घेत असताना त्यांच्या हातात भगवद्गीता होती.दरम्यान, शिवानी राजा यांनी १४ हजार ५२६ मते मिळवत त्यांच्या विरोधी उमेदवाराचा ४ हजार ४२६ मतांनी पराभव केला. यूकेमध्ये ६५० जागांवर निवडणूक झाली. खासदार शिवानी राजा यांची आई राजकोटच्या आहेत तर वडील गुजराती आहेत. शिवानी राजा यांचा जन्म लीसेस्टरमध्ये झाला आहे.