भुवनेश्वर मधील कलिंगा स्टेडियमवर फेडरेशन करंडक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पुरुषांची भालाफेक स्पर्धा (१५ मे) बुधवारी पार पडली. या स्पर्धेत नीरज चोप्राने पहिला क्रमांक पटकावला. नीरज या स्पर्धेत तीन वर्षांनंतर सहभागी झाला होता.
या स्पर्धेत नीरज त्याच्या सर्वोत्तम लयीत दिसला नाही. पाच दिवसांपूर्वीच डायमंड लीग खेळून आल्यानंतर तो या स्पर्धेत सहभागी झाला होता. तथापि, त्याने बुधवारी सर्वोत्तम ८२.२७ मीटर लांब भालाफेक करीत सुवर्णपदक पटकावले.
दरम्यान, या स्पर्धेत नीरजने पहिल्या प्रयत्नात ८२ मीटर लांब भालाफेक करीत रौप्य पदक पटकावले, तर उत्तम पाटीलने कांस्य पदक मिळवले. त्याने ७८.३९ मीटर लांब भाला फेकला.