khabarbat

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

HAMAS : इस्त्राईली हल्ल्यात ‘हमास’च्या म्होरक्याचा खात्मा; ८ हजार दहशतवादी ठार

उत्तर गाझातील सुमारे ८ हजार दहशतवाद्यांचा खात्मा इस्त्राईली सैनिकांनी केला. याशिवाय परिसरातील हजारो शस्त्रे आणि लाखो कागदपत्र जप्त करण्यात आली. उत्तर गाझा पट्टीतील हमासचे दहशतवादी आता नेतृत्वहीन झाले, त्यांच्याकडे सूचना द्यायला कमांडर देखील नसल्याचे इस्त्राईली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी स्पष्ट केले.

जबलिया भागात बटालियन कमांडर, डेप्युटी ब्रिगेड कमांडर आणि ११ कंपनी कमांडर मारले आहेत. जे दहशतवाद्यांचे नेतृत्व करत होते. या भागात मारला गेलेला सर्वात मोठा दहशतवादी अहमद रांदोर आहे.

HAMAS leader killed by israel army.

डॅनियल हगारी म्हणाले, जबालिया येथे इंडोनेशियन रुग्णालयासह दोन रुग्णालये होती. येथे भूमिगत पायाभूत सुविधा, शस्त्रे आणि लष्करी उपकरणे होती. दोन्ही ठिकाणी विशेष मोहीम राबवून दहशतवाद्यांच्या मुलभूत सुविधा नष्ट करण्यात आल्या.

हमासचे दहशतवादी सामान्य लोकांच्या वेशात पळून जाण्याचा किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न करू नयेत म्हणून स्थानिक रहिवाशांना तेथून हटवण्यात आल्याचे लष्कराने म्हटले. एकट्या जबलियामध्ये ६७० हवाई हल्ले करण्यात आले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »