Udo airlines Pvt. Ltd. या नागरी विमानसेवा पुरविणाऱ्या कम्पनीने भारतात पाय रोवले आहेत. आता Fly 91 या ब्रॅण्डच्या नावे नांदेड, जळगाव, अगाटी, सिंधुदुर्ग येथून लवकरच सेवा देण्यास सुरुवात करीत आहे. याविषयीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

मराठवाड्यातील नांदेड येथून बेंगलोर, आणि गोव्यासाठी विमानसेवा पुरविली जाणार आहे.
जळगाव येथून पुणे, गोवा, हैदराबाद येथे सेवा पुरविली जाईल.
सिंधुदुर्ग येथून पुणे, बेंगलोर आणि हैदराबाद येथे विमानसेवा मिळेल.
अगाटी येथून बेंगलोर आणि गोव्याला विमान सेवा दिली जाणार आहे.