चेन्नई : भाजप (BJP) च्या आयटी सेलमधील १३ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. भाजप ज्या पक्षासोबत युतीमध्ये आहे त्या ‘ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम’ (AIDMK) या पक्षात १३ नेत्यांनी प्रवेश केला. हे सर्वजण तामिळनाडूतील आहेत. यानंतर भाजपनं एडाप्पडी पलानीस्वामी यांच्यावर भाजप नेत्यांना विकत घेतल्याचा आरोप केला.
भाजपच्या आयटी आघाडीचे अध्यक्ष अनबरासन यांनी म्हटले, ” मी भाजपसाठी अनेक वर्षे काम केले. मी कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवली नाही. पण गेल्या काही दिवसांपासून पक्षात सुरु असलेल्या कारभारामुळे मी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला”
BJP leaders quit party
भाजपच्या ज्या नेत्यांनी राजीनामा दिला, त्यामध्ये १० आयटी विंगमधील जिल्हा सचिव आणि दोन आयटी विंग जिल्हा उपसचिवांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या आयटी विंगचे प्रमुख निर्मल कुमार यांनी भाजपच्या अन्नामलाई यांच्यावर गंभीर आरोप करत अद्रमुकमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर हा राजीनाम्याचा सिलसिला कायम राहिला.
अन्नामलाई यांनी आरोप केला की, “भाजपच्या काही नेत्यांनी अद्रमुकत प्रवेश केला. त्यांना वाटते की ते मोठा पक्ष चालवत असून भाजपच्या नेत्यांना विकत घेऊन त्यांचा पक्ष आणखी मोठा करणार आहेत. यावरुन एकच सिद्ध होते की, भाजप तामिळनाडूत मोठा होत आहे.