khabarbat

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

MPSC नोकर भरती २०२३; लिपिक-टंकलेखक पदाच्या ७०३४ जागा

MPSC नोकर भरती २०२३

लिपिक-टंकलेखक पदाच्या ७०३४ जागा

मुंबई : MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल ८ हजार १६९ पदांसाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून पदे भरली जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्यपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा २०२३ ही ३० एप्रिल २०२३ रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २ सप्टेंबर २०२३ रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ शनिवारी ९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून भरावयाच्या एकूण ८,१६९ पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »