khabarbat

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

IRCTC : अवघ्या ५० हजारात थायलंड, बँकॉक, पटाया !

नवी दिल्ली : ‘आयआरसीटीसी’ची ही नवी ऑफर नक्कीच फायद्याची आहे. थायलंड टूर साठी ‘थायलंड स्प्रिंग फेस्टिव्हल टूर’ नावाने एक जबरदस्त पॅकेज भारतीय रेल्वेने पर्यटकांसाठी आखले आहे. जर तुम्हाला कुटुंबासह विदेश वारी करायची असेल तर कमी खर्चात तुमची ट्रीप होऊ शकते.

असे आहे पॅकेज …

आयआरसीटीसीच्या या नव्या ऑफरमध्ये ५ रात्री आणि ६ दिवसांचे पॅकेज मिळते.

तुम्हाला थायलंड, बँकॉक, पटाया फिरायला मिळेल.

ही टूर २१ जानेवारी ते २६ जानेवारी २०२३ दरम्यान असेल.

कोलकत्ताहून टूर सुरू होईल.

कोलकत्त्याहून बँकॉक, पटाया असे फिरवले जाईल.

या पॅकेजमध्ये रेल्वेकडून राहणे आणि जेवणाच्या सोय आहे.

ज्या हॉटेलला राहण्याची सोय केली जाईल तिथून पुढे फिरण्यासाठी वाहन सोय देखील आहे.

शिवाय एक गाइड सुध्दा देण्यात येणार आहे.

असा येणार खर्च

जर एकटेच जाणार असाल तर ५४ हजार ३५० रुपये खर्च आहे.

जर दोघे किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र जाणार असाल तर ४६ हजार १०० रुपये प्रति व्यक्ती खर्च येईल.

याविषयीच्या अधिक माहितीसाठी IRCTCच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »