शांघाय : News Network
चीनमधील एक रोबोटिक्स कंपनी असा रोबोट बनवत आहे जो माणसांप्रमाणेच मुलांना जन्म देऊ शकेल. हा रोबोट पुढील वर्षी तयार होईल.


चिनी रोबोटिक्स कंपनी ‘कैवा टेक्नॉलॉजी’ने दावा केला आहे की, ते जगातील पहिला प्रेग्नेंसी रोबोट बनवत आहे. हा रोबोट माणसाप्रमाणेच मुलाला जन्म देऊ शकेल. या कंपनीचे सीईओ झांग किफेंग म्हणाले की, हा प्रेग्नेंसी रोबोट १० महिन्यांची गर्भधारणा पूर्ण करू शकतो. त्यानंतर तो ख-या मुलालाही जन्म देईल.
या रोबोटच्या पोटात एक कृत्रिम गर्भाशय असेल, जे गर्भाला पोषण देईल. हा रोबोट पुढील वर्षी लाँच केला जाईल. त्याची किंमत १ लाख युआन (सुमारे रु. ११.६ लाख) असेल.
यावर काही चिनी तज्ज्ञांनी असा दावा केला की, यामुळे बाळ आणि आईमधील नैसर्गिक संबंध संपुष्टात येईल. तथापि, अनेक वैद्यकीय तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, रोबोटना मानवांप्रमाणे पुन्हा गर्भधारणा करणे जवळजवळ अशक्य आहे.