मुंबई : News Network
जगातील सर्वात प्रसिद्ध आणि महागडी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनने आज पहिल्यांदाच १.०८ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. २००९ मध्ये जवळजवळ शून्य किंमतीपासून सुरू झालेला बिटकॉईनचा प्रवास आज डिजिटल संपत्तीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे. या एका वर्षातच बिटकॉइनची किंमत सुमारे ५७ लाख रुपयांनी वाढली आहे. एकंदरीत २००९ मध्ये १ रुपयाचीही गुंतवणूक केली असती, तर आज १ कोटी रुपयांच्या वर किंमत मिळाली असती.

हे पण वाचा…. कर्मचा-यांसाठी गुडन्यूज! ८ वा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार?
बिटकॉईनची सुरुवात २००९ मध्ये सातोशी नाकामोटो नावाच्या गूढ व्यक्तीने केली होती. त्यावेळी त्याचे बाजारमूल्य शून्याच्या जवळ होते. २०१० मध्ये बिटकॉईनची किंमत प्रथमच $०.१० (८ रुपये) झाली. पुढील काही वर्षांत यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. २०१३ मध्ये ही किंमत $१००० (सुमारे ८७,००० रुपये) झाली आणि आज २०२५ मध्ये ती १.०८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
बिटकॉईनच्या वाढीमागील कारणे :
– अमेरिकन धोरणात बदल : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्रिप्टोला अनुकूल धोरणे राबवली. बँकांना क्रिप्टो कंपन्यांसोबत व्यवहार करण्याची परवानगी देण्यात आली.
– संस्थात्मक गुंतवणूक वाढली : मोठ्या गुंतवणूकदारांनी बिटकॉईन ‘इटीएफ’ मध्ये अब्जावधींची गुंतवणूक केली.
– जगभरात स्वीकार : लंडन, थायलंडसारख्या बाजारांमध्ये क्रिप्टो ‘इटीएफ’ला मंजुरी मिळाल्याने जागतिक स्वीकार वाढला.