khabarbat

8th Pay Commission may come into effect from January 1, 2026. Therefore, possibility of getting the increased salary along with arrears.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

8th Pay Commission | कर्मचा-यांसाठी गुडन्यूज! ८ वा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार?

नवी दिल्ली : प्रतिनिधी
देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक अनेक दिवसांपासून आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. पण अद्याप त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. याबद्दल आता सरकारने संसदेत स्पष्टीकरण दिले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले की, आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेत होणा-या विलंबाचे कारण म्हणजे, विविध मंत्रालये आणि राज्यांकडून अजूनही सूचना मागवण्यात येत आहेत.

८ व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कधी?
– केंद्र सरकारने या वर्षी जानेवारी २०२५ मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली होती. या आयोगाचे उद्दिष्ट कर्मचा-यांचे वेतन, पेन्शन, भत्ते आणि इतर सुविधांचा आढावा घेणे आहे.
– सरकारने केलेल्या अंदाजानुसार, ८ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू होऊ शकतात.
– आयोगाचा अहवाल तयार होण्यासाठी, त्याचे पुनरावलोकन आणि मंजुरीसाठी सुमारे १.५ ते २ वर्षे लागू शकतात. त्यामुळे, वाढीव वेतन थकबाकीसह मिळण्याची शक्यता आहे.

नवीन फिटमेंट फॅक्टर काय असेल?
सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ निश्चित करण्यात आला होता. यावेळचा फिटमेंट फॅक्टर १.९२ ते २.८६ च्या दरम्यान असू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचा-याचा मूळ पगार ३०,००० रुपये असेल आणि नवीन फिटमेंट फॅक्टर २.५७ ठरला, तर त्याचा नवीन पगार ७७,१०० रुपये होऊ शकतो.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »