khabarbat

Intern Robert Thad stole some of the rocks and soil brought back from the moon by NASA's spacecraft for research, kept them under his bed at home, and had a romance with his girlfriend over them.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

NASA इंटर्नचा प्रताप : चक्क चंद्रावर केला गर्लफ्रेंडशी रोमान्स! Romance on Moon

सॅनफ्रान्सिस्को : News Network
NASA च्या यानाने संशोधनासाठी चंद्रावरून आणलेल्या दगड, मातीपैकी काही दगड रॉबर्ट थाड या इंटर्नने चक्क चोरले आणि घरी बेडखाली ठेवत त्यावर गर्लफ्रेंडसोबत रोमान्स केला. Times ला दिलेल्या मुलाखतीत या प्रेमवीराने हा किस्सा सांगितला आहे. या दगडाची किंमत २१ दशलक्ष डॉलर एवढी प्रचंड होती.

Intern Robert Thad stole some of the rocks and soil brought back from the moon by NASA's spacecraft for research, kept them under his bed at home, and had a romance with his girlfriend over them.
Intern Robert Thad stole some of the rocks and soil brought back from the moon by NASA’s spacecraft for research, kept them under his bed at home, and had a romance with his girlfriend over them.

उल्लेखनिय म्हणजे त्याची गर्लफ्रेंड देखील नासामध्येच काम करत होती. रिलेशन अधिक रोमँटीक बनविण्यासाठी रॉबर्टला ही आयडिया सुचली होती. त्याची गर्लफ्रेंड टिफनी फाउलरने देखील त्याला यासाठी मदत केली. या प्रकारावर रॉबर्ट म्हणतो की, यापेक्षा चांगले काहीही असू शकत नव्हते. कारण ते चंद्रावर रोमान्स करण्यासारखे होते.

दगड चोरण्यासाठी काय केले…
या प्रकरणात रॉबर्टला त्याच्या सहका-यांचीही साथ मिळाली. या सर्वांनी मिळून नासाचे सिक्युरिटी कॅमेरे रिडिझाईन केले. नियोप्रीन बॉडीसूट घातले आणि हे चंद्राचे दगड ठेवलेल्या लॅबपर्यंत पोहोचण्यासाठी ऑफिशियल बॅज देखील तयार केले. रॉबर्ट, फाउलर आणि त्यांच्या एका मित्राने मिळून १७ पाऊंड वजनाचा एक दगड चोरला. अर्थात, ही घटना होती २००२ ची. परंतू, एवढे केल्यानंतरही हे लोक पकडले गेले. एफबीआयने हा आर्थिक गुन्हा मानला. या लोकांनी पैशासाठी हे केल्याचा ठपका ठेवण्यात आला. बेल्जिअमच्या एका खरेदीदाराच्या हे लोक संपर्कात होते, तो या दगडांसाठी १ ते ५ हजार डॉलर देण्यास तयार होता, असा दावा करण्यात आला. या खरेदीदारानेच या लोकांवर संशय आल्याने एफबीआयला माहिती दिली आणि रॉबर्टचे बिंग फुटले. रॉबर्टला या गुन्ह्यासाठी ८ वर्षांची शिक्षा झाली. तर त्याची गर्लफ्रेंड फाउलरला १५० तास समाज सेवा आणि ९००० डॉलरचा दंड ठोठावण्यात आला.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »