शेतमाल निर्यातीची ठळक वैशिट्ये
– महाराष्ट्राला फळे, भाजीपाला आणि फुलांच्या निर्यातीतून ६ हजारांहून अधिक कोटींचे उत्पन्न
– राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ५४ हजार शेतक-यांकडून फळपिकांची लागवड
– २०२४-२५ मध्ये फळबाग लागवडीतून १० लाख ६३ हजार मेट्रिक टन मालाची निर्यात
नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्राने फळे, भाजीपाला आणि फुलांच्या निर्यातीतून ६ हजारांहून अधिक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत राज्यातील हापूस आंबा, द्राक्षे, डाळिंब, कांदा, भाजीपाला तसेच सजावटीची फुले यांना मोठी मागणी आहे.


राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ५४ हजार शेतक-यांकडून फळपिकांची लागवड करण्यात येते, तर १४ जिल्ह्यांतील आदिवासींना रोजगार मिळत आहे. सन २०२४-२५ मध्ये फळबाग लागवडीतून सुमारे १० लाख ६३ हजार मेट्रिक टन मालाची निर्यात करण्यात आली असून, सुमारे ६ हजार ३२९ कोटींचे उत्पन्न राज्याला प्राप्त झाले आहे.
शेतक-यांना निर्यातक्षम उत्पादनासाठी आधुनिक शेतीपद्धती, थंड साठवण व्यवस्था आणि थेट निर्यातदारांशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे पुढील काही वर्षांत निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारकडून ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत.