वेस्ट बॅँक : News Network
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सैन्याने वेस्ट बँक भागात २६२ मगरींना गोळ्या घालून मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पर्यावरणवाद्यांनी इस्रायलच्या या कृतीवर तीव्र शब्दात टीका केली.


इस्रायली सैन्याने व्यापलेल्या वेस्ट बँकमधील बेकायदेशीर वस्ती असलेल्या पेटझेलजवळील एका क्रोकोडायल फार्ममध्ये २६२ मगरींना गोळ्या घालून मारले. सैन्याने आधी तलावाचे पाणी काढून टाकले, नंतर शेकडो मगरींना गोळ्या घातल्या. हा परिसर एकेकाळी लोकप्रिय पर्यटन स्थळ होते. येथे मगरींच्या कातड्याचा व्यवसायदेखील व्हायचा. २००० च्या दशकात येथे सुमारे ३,००० मगरी आणण्यात आल्या होत्या.
इस्रायली सैन्याचे म्हणणे आहे की, या फार्मची योग्य देखभाल केली जात नव्हती, त्यामुळे मगरी स्थानिक नागरिकांसाठी धोकादायक ठरत होत्या. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मगरी वाईट परिस्थितीत राहत आहेत. अन्नाअभावी त्या एकमेकांवरही हल्ला करतात. २०१३ पासून इस्रायलमध्ये नाईल मगरींना संरक्षित प्रजाती म्हणून घोषित करण्यात आले आहे. तरीदेखील सैन्याने या मगरींना गोळ्या घालून ठार मारले.