वॉशिंग्टन : News Network
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५० टक्के शुल्क लादले. दरम्यान, भारताच्या अर्थव्यवस्थेला त्यांनी Dead Economy म्हटले होते. Trump यांना भारताची अर्थव्यवस्था आवडत नसली तरी अमेरिकन लोकांना भारतीय अर्थव्यवस्थेचे वेड आहे.

भारताच्या शेअर बाजारात याचे उदाहरण पाहायला मिळते. भारतीय शेअर्समधील परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. भारताच्या परकीय पोर्टफोलिओ गुंतवणुकीत (FPI) अमेरिकेने ३० टक्क्यांहून अधिक गुंतवणूक केली आहे. देशाच्या एकूण FPI होल्डिंगमध्ये अमेरिकन एफपीआयचा वाटा ३१.०४% होता, जो इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. या काळात, सिंगापूरचा वाटा २८.११% होता. भारत-अमेरिका टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात अमेरिकन एफपीआयचा वाढता विश्वास भारतीय अर्थव्यवस्था मृत झालेली नाही हे दर्शवतो.
कोणत्या देशाचा किती वाटा?
भारतात एफपीआय होल्डिंगच्या बाबतीत टॉप १० देशांमध्ये अमेरिका, सिंगापूर, नॉर्वे, मॉरिशस, केमन आयलंड, लक्झेंबर्ग, यूएई, कतार, ब्रिटन आणि जपान यांचा समावेश आहे. टॉप ५ देशांचा एफपीआयमध्ये ९० टक्के वाटा आहे. हा वाटा पुढीलप्रमाणे आहे :
अमेरिका : ३१.०४%
सिंगापूर : २८.११%
नॉर्वे : १५.४०%
मॉरिशस : ११.२५%
केमन आयलंड : ०४.०८%