बीजिंग : News Network
china offering child subsidy | चीन सरकारने जन्मदरवाढीला वाव देण्यासाठी प्रत्येक मुलासाठी पालकांना तीन वर्षे दरवर्षी ३६०० युआन (सुमारे ५०० डॉलर) निधी देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजे तीन वर्षांत एका मुलासाठी एकूण १०,८०० युआन (सुमारे १५०० डॉलर) मिळणार आहेत. परंतु, या रकमेमुळे जास्त परिणाम होईल का, हा प्रश्न अनेक तरुणांच्या मनात आहे.

१९७९ मध्ये चीनचे तत्कालीन नेते डँग शियाओपिंग यांनी जन्मदर नियंत्रणासाठी one child policy लागू केली होती. मात्र सुमारे चार दशकांनंतर चीन सरकारने या नियमाच्या पूर्णत: उलटा निर्णय घेतला आहे. आता पालकांना मुलांसाठी आर्थिक सहाय्य देऊन जन्मदर वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हे पण वाचा… फॉरवर्ड करा… SBI मध्ये क्लर्कच्या ६,५८९ जागांसाठी भरती
तरुणांची मन:स्थिती बदलली : चीनमधील ब-याच युवा तरुणांना मुलं वाढवण्याच्या खर्चाबाबत मोठी चिंता आहे. काही नागरिकांच्या मते, मुलं वाढवण्याचा खर्च फार मोठा आहे. वर्षाला ३६०० युआन तर फारच कमी आहेत. युआवा पॉप्युलेशन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या एका अभ्यासानुसार, चीनमध्ये एका मुलाला १८ वर्षे वाढवण्यासाठी सरासरी ५,३८,००० युआन (७५,००० डॉलर) खर्च येतो. हे चीनच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या प्रति व्यक्ती उत्पन्नाच्या सहा पटीहून अधिक आहे.
बेरोजगारीचा वाढता दबाव : चीनच्या आर्थिक वाढीत मंदी जाणवत आहे, तर तरुणांमध्ये बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे लग्न आणि मुलांसाठीची आर्थिक तयारी करणे कठीण झाले आहे. काही अभ्यासक म्हणतात की, जन्मदर कमी होण्याचे कारण फक्त आर्थिक नसून, सामाजिक आणि मानसिक घटकांमध्येही बदल झाले आहेत.