SBI Clerk Recruitment 2025 | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून ज्युनियर असोसिएट्स- कस्टमर सपोर्ट अँड सेल्स (SBI Clerk) पदांसाठी आज ६ ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. SBI मध्ये ज्युनियर असोसिएट पदाच्या ६,५८९ रिक्त जागा आहेत. एसबीआय क्लर्क पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ ऑगस्ट आहे.

SBI Clerk पदासाठी पात्रता/वयोमर्यादा :
इच्छुक उमेदवारांचे वय १ एप्रिल २०२५ रोजी २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. याचाच अर्थ असा की उमेदवारांचा जन्म २ एप्रिल १९९७ आधी आणि १ एप्रिल २००५ नंतर (दोन्ही दिवसांचा समावेश) झालेला नसावा. राखीव श्रेणीतील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळेल. क्लर्क पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी अथवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
SBI Clerk निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रियेदरम्यान ऑनलाइन परीक्षा (Preliminary आणि Main exam) होईल. ही चाचणी निवडलेल्या स्थानिक भाषेत असेल
Preliminary examination : ऑनलाइन Preliminary परीक्षेसाठी १०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, त्याचा कालावधी १ तासाचा असेल
Mains examination : या परीक्षेत २०० गुणांसाठी १९० प्रश्न असतील. त्याचा कालावधी २ तास ४० मिनिटे राहील