The Chinese army has now conducted a war drill with a robot in the form of a wolf. This robot wolf was seen firing 60 bullets in a minute.

बिजींग : चीनच्या सैन्याने आपल्या भात्यात आता लांडग्याच्या रुपातील रोबो आणला आहे. मंगळवारीच चिनी सैन्याने या रोबोसोबत युद्धसराव केला. एका मिनिटाला हा रोबो लांडगा ६० गोळ्या झाडताना दिसून आला. म्हणजेच एका सेकंदाला एक गोळी हा लांडगा झाडत होता.
आजची युद्धे हायटेक होत असतानाच चीनने सैन्यासोबत लांडग्याच्या रुपातील रोबो युध्द सरावात आणल्याने भविष्यातील युद्धे कोणत्या पातळीवर जाऊन लढली जातील याची कल्पनाही धडकी भरवणारी आहे. अशा प्रकारच्या शस्त्रांचा सामना कसा करायचा याची शत्रूला माहितीही नसणार आहे. या लांडग्यामध्ये क्युबीझेड-१९१ असॉल्ट रायफल बसवण्यात आली आहे.
दुर्गम भागात लढण्यासाठी चिनी सैनिक कमकुवत आहेत. यामुळे चीनने या लांडग्याची निर्मिती केली. चीनचे सध्या जपान, फिलीपिन्स, तैवान, भारत यासारख्या देशांशी वैर आहे. यामुळे चीन आपले सैन्य हायटेक करण्यात गुंतलेला आहे.
Just click Link and see detail video