khabarbat

Raj Thackeray said, "Just arrest us." Responding to this, Chief Minister Devendra Fadnavis said, "If you behave like an urban Naxal, you too will be arrested."

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Raj Thackeray will be arrested| … तर अटक करणारच! राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा इशारा

नागपूर : प्रतिनिधी
Raj Thackeray will be arrested | “महाराष्ट्र विधानसभेने नुकताच जनसुरक्षा कायदा मंजूर केला. काही दुरुस्त्या आणि बदल होऊन विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा कायदा मंजूर करण्यात आला. विरोधकांनी या कायद्याला विरोध सुरुच ठेवला आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या कायद्यावरुन बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले. आम्हाला फक्त अटक करून दाखवा असे राज ठाकरे यांनी म्हटले. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्बन नक्षलसारखे वागाल, तर तुम्हालाही अटक होईल, असे म्हटले.

शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी रायगडमध्ये हजेरी लावली होती. यावेळी भाषणामध्ये राज ठाकरेंनी जनसुरक्षा कायद्यावरुन सरकारवर निशाणा साधला होता.

आंदोलकांच्या विरोधात हा कायदा नाही. सरकारच्या विरोधात बोलायची पूर्ण मुभा आहे. त्यासाठी हा कायदा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये ही कायदा न वाचता केलेली आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी आग्रही असल्याचेही राज ठाकरे म्हणाले. त्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. माझे मत आहे की, महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे, ती अनिवार्य असली पाहिजे. पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा शिकायला मिळाली तर त्यात काय वावगे आहे. आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या या मानसिकतेला माझा विरोध आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »