देशभरातील बँकांमध्ये क्लर्क पदाच्या १० हजारांहून अधिक रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. १ ऑगस्ट पासून IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर या नवीन भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा IBPS द्वारे विविध राज्यांमधील १०२७७ पदे भरली जाणार आहेत. यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातसाठी सर्वाधिक पदे आहेत.

ऑनलाइन नोंदणी १ ऑगस्ट २०२५ ते २१ ऑगस्ट २०२५
प्रिलिम्स हॉलतिकीट सप्टेंबर २०२५
प्रिलिम्स परीक्षा ऑक्टोबर २०२५
प्रिलिम्स परीक्षेचा निकाल नोव्हेंबर २०२५
ऑनलाइन मुख्य परीक्षा नोव्हेंबर २०२५
प्रोव्हिज्नल अलॉटमेंट मार्च २०२६
आयबीपीएस लिपिक वेतन : पात्रता : वयोमर्यादा
पात्रता- आयबीपीएस लिपिक फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा- किमान २० वर्षे ते कमाल २८ वर्षे. म्हणजेच, उमेदवारांचा जन्म २ ऑगस्ट १९९७ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००५ नंतर झालेला नसावा.
वेतन- २४०५०-६४४८० रुपयांपर्यंत, इतर भत्ते देखील उपलब्ध असतील.
अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट www.ibps.in ला भेट द्या. प्रथम मूलभूत तपशील भरून नोंदणी करा. नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. नंतर फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करुन विचारलेली इतर माहिती भरा. भरलेल्या फॉर्म तपासा आणि अर्जाचा शुल्क भरा.