क्विन्सलॅँड : News Network
ऑस्ट्रेलियाच्या संसदेत एक खुप सुंदर क्षण पाहता आला. क्विन्सलँडची लेबर पार्टी नवनिवार्चित सिनेटर कोरिन मुलहॉलँड (Corinne Mulholland) यांनी आपले पहिले संसदेतले भाषण आपल्या तान्हुल्या ऑगी या मुलास कडेवर घेऊन केले आहे. हा क्षण केवळ भावनात्मक नव्हता तर एक सशक्त संदेश देखील दिला. त्या म्हणाल्या की, खासदार केवळ लोकप्रतिनिधी नसतात तर एक पालकही असतात.

लेबर पार्टीच्या सिनेटर कोरिन मुलहॉलँड (Corinne Mulholland) यांनी पहिल्यांदा सिनेटमध्ये आपले भाषण दिले तेव्हा त्यांच्या कडेवर तिन महिन्याचा मुलगा ऑगी होता. त्या हसत म्हणाल्या की,’ मी आशा करतेय की मी आणि ऑगीसह कोणत्याही अडचणीशिवाय हे भाषण पूर्ण करु शकेन,’या भाषणात कोरिन यांनी आपल्या व्यक्तीगत अनुभवांद्वारा त्या सर्व नोकरी करणा-या पालकांच्या भावनांना आवाज दिला ते रोज आपल्या कौटुंबिक जबाबदारी आणि प्रोफेशन लाईफ दरम्यान संतुलनाच्या खटपटीत लागलेले असतात.
नोकरदार आई-वडिलांसाठी मार्ग प्रशस्त
त्यांनी हे ही सांगितले की, आता अखेर अनेक पिढ्यांनी नोकरीपेशा आई-वडिलांसाठी हा मार्ग प्रशस्त केला आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे की, संसदेच्या बाहेरच्या जगातही असा लवचिकपणा आणि पर्यायांची व्यवस्था केली पाहीजे. त्या म्हणाल्या की,’ मी नोकरदार कुटुंबाच्या जीवनाला थोडे सोपे बनवू इच्छित आहे. मला वाटते की कुटुंबांना हा पर्याय आणि स्वतंत्रता मिळायला हवी की केव्हा आणि कुठे काम करावे.’ कोरिन (Corinne Mulholland) यांच्या कुशीत ऑगी कोणत्याही अडचणीशिवाय बिनधास्त होता, तरीही भाषण संपवण्यापूर्वी ऑगीला अन्य सिनेटरकडे सोपवावे लागले.