नवी दिल्ली : News Network
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्Þड ट्रम्प यांनी जेव्हापासून दुस-या वेळचा राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे, तेव्हापासून ते जगाला त्रासच देत सुटले आहेत. ट्रम्प यांना सर्वाधिक भारत आणि चीन खुपतो आहे. त्यांनी अमेरिकनांना देखील छळण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर भारत, चीन सारख्या देशांना टेरिफ वॉरवरून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आहे.

रशियाकडून जर भारताने कच्चे तेल घेणे बंद केले नाही तर अमेरिका १०० टक्के टेरिफ लादणार असल्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. जर भारताने ही धमकी गांभिर्याने घेतली व रशियाकडून तेल आयात करणे थांबविले किंवा सर्व जगानेच रशियाकडून तेल आयात थांबविली तर पेट्रोल, डिझेलचे दर ८ ते १० रुपयांनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला अद्याप दोन महिन्यांचा वेळ असला तरी देखील ही शक्यता नाकारता येत नाही. कारण केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी देखील याबाबत भीती व्यक्त केली आहे.
हे पण वाचा…. Alimony | कमावत्या पत्नीलाही पोटगी मिळण्याचा अधिकार
रशियाकडून २०२२ पर्यंत भारत केवळ २ टक्केच कच्चे तेल घेत होता, परंतू रशियावर निर्बंध आले आणि रशियाने भारताला स्वस्तात कच्चे तेल देण्यास सुरुवात केली. आता रशिया जेवढे कच्चे तेल निर्यात करतो त्यापैकी ३८ टक्के तेल हे भारत खरेदी करतो एवढे प्रमाण वाढले आहे. जगाला ९७ दशलक्ष बॅरल कच्चे तेल लागते, त्याच्या जवळपास १० टक्के वाटा हा रशियाचा आहे. जर रशियाकडून कच्चे तेल बाजारात आले नाही तर या देशांना ९० टक्के तेलातूनच खरेदी करावी लागणार आहे. म्हणजेच कच्च्या तेलाचे दर वाढणार आहेत, अशी शक्यता केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी व्यक्त केली.