khabarbat

Vande Bharat Railway facility is now available for devotees going from Sambhajinagar (Aurangabad) to Shegaon.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

संभाजीनगर (औरंगाबाद) ते शेगाव वंदे भारतची सुविधा; पुणे-नागपूर स्लीपर सुरु होणार

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
संभाजीनगर येथून शेगावला जाणा-या भाविक यात्रेकरूंना आता वंदे भारत रेल्वेची सुविधा उपलब्ध झाली आहे. ही रेल्वे पुणे येथून निघणार असून या रेल्वेला दौंड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना येथे थांबे दिले जाणार आहेत. धार्मिक यात्रेकरूंना या ट्रेनचा लाभ घेता येणार आहे. पुण्यातून अनेक भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जात असतात.

पुणे शहराला रेल्वेकडून ४ वंदे भारत ट्रेनची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे पुणे शहराची हाय-स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे. या ४ वंदे भारत ट्रेनमुळे शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगावला जाणा-या प्रवाशांना फायदा होणार आहे.

पुणे-वडोदरा वंदे भारत ट्रेन लोणावळा, पनवेल, वापी, सुरत या ठिकाणी थांबण्याची शक्यता आहे. सध्याचा पुण्यावरून वडोद-याला जाण्यासाठी ९ तासांचा वेळ लागतो, मात्र वंदे भारतने हा प्रवास ६ ते ७ तासांत होणार आहे. या ट्रेनमुळे व्यावसायिकांना खास फायदा होणार आहे. यामुळे मुंबई-पुणे-गुजरात कॉरिडॉरची कनेक्टिव्हिटी देखील सुधारणार आहे.

पुणे-सिकंदराबाद वंदे भारत
पुणे-सिकंदराबाद ही वंदे भारत ट्रेन दौंड, सोलापूर, गुलबर्गा येथे थांबण्याची शक्यता आहे. या वंदे भारतमुळे प्रवासाचा वेळ २-३ तास कमी होणार आहे. ही नवीन ट्रेन व्यावसायिक, तांत्रिक आणि आयटी व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणामधील कनेक्टिव्हिटी मजबूत होणार आहे.

पुणे-बेळगाव वंदे भारत
पुणे-बेळगाव ही वंदे भारत ट्रेन सातारा, सांगली, मिरज येथे थांबण्याची शक्यता आहे. या ट्रेनमुळे कर्नाटकच्या उत्तरेकडील भागाचा पुण्याशी संपर्क वाढणार आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांचे २-३ तास वाचण्याची शक्यता आहे.

पुणे-नागपूर स्लीपर वंदे भारत सुरु होणार
रेल्वे मंत्रालय सध्या स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पुणे आणि नागपूर दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु केली जाणार आहे. यामुळे महाराष्ट्राची उपराजधानी आणि सांस्कृतीक राजधानी जोडली जाणार आहे. या स्लीपर ट्रेनमुळे दोन्ही शहरांमधील व्यावसायिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना फायदा होणार आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »