khabarbat

America wants to send its dairy products to India. However, India has clearly rejected this.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Non Veg Milk | अमेरिकी नॉन-व्हेज दुधाला केंद्र सरकारची नकार घंटा

नवी दिल्ली : प्रतिनिधी
भारत आणि अमेरिका यांच्यात ट्रेड डील अथवा व्यापार करारासंदर्भात ब-याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र आता त्यात काहीसा अडथळा येताना दिसत आहे. अमेरिकेला आपले डेअरी प्रॉडक्ट्स भारतात पाठवायचे आहेत. मात्र, भारताने याला स्पष्ट नकार दिला आहे. कारण यात, गायीचे मांसाहारी दूध पाठवण्याची अमेरिकेची इच्छा आहे. डेअरी प्रॉडक्ट्ससाठी प्रमाणपत्र लागेल, असे भारताचे म्हणणे आहे.

दूध उत्पादनाच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत दुग्ध क्षेत्राचा वाटा ३ टक्क्यांपर्यंत आहे. याचे एकूण मूल्य सुमारे ९ लाख कोटी रुपये एवढे आहे. अमेरिकेने दुग्ध क्षेत्राशी संबंधित वस्तू पाठवायला सुरुवात केली, तर भारताला दरवर्षी १.०३ लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. याशिवाय, अमेरिकेला नकार देताना भारताने धार्मिक भावनांचाही हवाला दिला आहे.

काय असते गायीचे मांसाहारी दूध
खरे तर, भारतात गायींना खाद्य म्हणून चारा आणि गवत दिले जाते. याशिवाय इतरही काही नैसर्गिक गोष्टी दिल्या जातात. मात्र, अमेरिकेत या सर्वांची मोठी कमतरता आहे. यामुळे अमेरिकेत गायींना स्वस्त प्रोटिन्सच्या स्वरुपात चा-यातून डुक्कर, कोंबडी, मासे अथवा घोड्याची चरबी दिली जाते. म्हणूनच भारताने अमेरिकन दुग्धजन्य पदार्थांना नकार दिला आहे. दरम्यान, यामुळे व्यापार करारात अनावश्यक अडथळा येत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »