नवी दिल्ली : प्रतिनिधी
toll will be halved | केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गावरील टोल टॅक्सबाबत आणखी एक नवीन नियम आणण्याची तयारी केली आहे. या नियमानुसार, जर १० मीटर रुंदीचा दोन पदरी रस्ता दुरुस्त करून ४ पदरी करणार असेल तर त्यासाठी टोलचे दर निम्मे केले जातील.

रस्ते बांधकामावेळी लोकांना पूर्ण सुविधा मिळत नाहीत. रस्त्यांची रुंदी कमी होते आणि त्यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे केंद्रीय परिवहन मंत्रालय यावर विचार करत आहे. जर सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर रस्ते बांधकामावेळी टोलचे दर ३० टक्के लागू होतील. परंतु यासाठी अर्थ मंत्रालयाकडून मान्यता मिळायला हवी.
हे पण वाचा…. सिगारेटसारखा इशारा आता समोसा, जिलेबीवर देखील!
असा आहे सरकारचा प्लॅन?
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पुढील २ वर्षात १० लाख कोटी रूपये खर्च करून २५ हजार किमीचे दोन पदरी रस्त्यांचे रुपांतर चार पदरीत करण्यात येणार आहेत. दोन पदरी रस्त्यावरील टोल कमी करण्याचा प्रस्ताव त्यासाठीच आहे. सरकार पुढील १० वर्षात दोन पदरी रस्ते सुधारण्यावर भर देत आहे. कारण देशात १.४६ लाख किमी नॅशनल हायवेपैकी ८० हजार किमी रस्ते याच श्रेणीत येतात. पूल, बोगदा, उड्डाणपूल आणि हायवेवरील उंच भागात टोलचे दर ५० टक्क्यांनी कमी केले जाऊ शकतात. त्यातून ट्रक आणि इतर अवजड वाहनांना फायदा मिळेल.