khabarbat

'Make in India' initiative completes 10 years this year, the Central Government will issue a special coin of Rs 100 to mark the occasion.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

‘Make in India’ ची दशकपूर्ती; येणार रु. १००चे विशेष नाणे!

नवी दिल्ली : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ सप्टेंबर २०१४ रोजी ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाची सुरुवात केली होती. त्याला यंदा १० वर्षे पूर्ण होत असल्याने त्यानिमित्त १०० रुपयांचे एक विशेष नाणे केंद्र सरकार जारी करणार आहे. ही माहिती नामवंत नाणेतज्ज्ञ सुधीर लुणावत यांनी दिली.

लुणावत म्हणाले की, हे १०० रुपयांचे विशेष नाणे कोलकाताच्या टाकसाळीमध्ये तयार करण्यात येईल. या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम असून त्यामध्ये ५०% चांदी, ४०% तांबे, ५% जस्त व ५% निकेल यांचे मिश्रण असेल. या नाण्याच्या एका बाजूस मध्यभागी मेक इन इंडियाचे बोधचिन्ह असलेल्या सिंहाची उठावदार प्रतिमा असेल. त्याच्यावरच्या कडेला हिंदीत आणि खालच्या कडेला इंग्रजीत ‘मेक इन इंडिया १०वा वर्धापनदिन’ असा मजकूर असणार आहे. सिंहाच्या चित्राभोवती विज्ञान-तंत्रज्ञान, कृषी आणि संगणक तंत्रज्ञान यांचे प्रतिनिधित्व करणारी आठ रंगीत चिन्हे असतील. या सिंहाच्या खाली २०२५ हे वर्ष नमूद केलेले असेल. या नाण्याच्या दुस-या बाजूस अशोक स्तंभाची प्रतिमा असेल. त्याखाली रुपयाचे प्रतीकचिन्ह आणि १०० हा नाण्याची किंमत दर्शविणारा आकडा असणार आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना ‘भारत’ आणि ‘रुपीज’ हे शब्द अनुक्रमे हिंदी व इंग्रजीत लिहिलेले असणार आहेत, असे सुधीर लुणावत यांनी सांगितले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »