मुंबई : प्रतिनिधी
भारतीय (RBI) रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी (HDFC) बँक आणि श्रीराम फायनान्सवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे केल्याने कारवाई करण्यात आली. जेव्हा जेव्हा एखादी बँक नियमांचे उल्लंघन करते आणि मनमानी पद्धतीने काम करते तेव्हा आरबीआय त्यावर दंड आकारू शकते. खाजगी क्षेत्रातील ‘एचडीएफसी’ बँकेला ४.८८ लाख रुपये आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी श्रीराम फायनान्स (Shriram Finance) लिमिटेडला २.७० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

The Reserve Bank of India (RBI) has taken action against HDFC Bank and Shriram Finance for violating regulations.
श्रीराम फायनान्सवर आरबीआय निर्देश, २०२५ च्या काही नियमांचे पालन न केल्याचा आरोप होता. ३१ मार्च २०२४ पर्यंतच्या आर्थिक स्थितीची तपासणी केल्यानंतर, कंपनीने कर्जाची रक्कम थेट तिच्या खात्यात जमा केली, परंतु पेमेंट तृतीय पक्षाच्या खात्याद्वारे केले गेले, असं RBI ला असे आढळून आले. कंपनीला नोटीस बजावण्यात आली आणि उत्तर मागितण्यात आले. श्रीराम फायनान्सचे उत्तर आणि सुनावणीनंतर, मध्यवर्ती बँकेने दंड आकारण्याचा निर्णय घेतला.
भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, ही कारवाई केवळ नियमांचे उल्लंघन केल्याच्या आधारे करण्यात आली आहे. याचा कर्ज कराराच्या वैधतेवर किंवा ग्राहकांसोबतच्या व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नाही.