khabarbat

There will be a 50 percent reduction in tolls on national highways, providing great relief to vehicle owners.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Toll Tax मध्ये दुरूस्ती; ५० टक्के होणार कपात, जाणून घ्या कोणत्या मार्गावर मिळणार फायदा

 

नवी दिल्ली : प्रतिनिधी
Toll Tax | राष्ट्रीय महामार्गावरील टोलमध्ये ५० टक्के कपात होणार असून वाहन धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बांधकाम असलेल्या मार्गांवर प्रवाशांकडून प्रति किलोमीटर १० पट टोल आकारला जात होता. यामागील उद्देश या महागड्या बांधकामांचा खर्च वसूल करणे होता. परंतु यामुळे प्रवाशांवरील आर्थिक भार वाढत होता. परंतु हा नियम बदलला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल टॅक्सच्या नियमात बदल केला आहे. यामुळे काही महामार्गांवरील टोल ५० टक्के कमी होणार आहे. ज्या महामार्गावर पूल, बोगदे, फ्लायओव्हर आणि एलिवेटेड रोड आहे त्या ठिकाणी टोल कमी होणार आहे.

हे पण वाचा… Mouse Juggler च्या मदतीने एकाच वेळी ५ ठिकाणी नोकरी!

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एनएच शुल्क नियम, २००८ मध्ये दुरूस्ती केली आहे. त्यासंदर्भात २ जुलै रोजी अधिसूचना काढण्यात आली आहे. या नियमात बदल केल्यानंतर टोल आकारण्यासाठी करण्यात येणारी मोजणीची पद्धत पूर्णपणे बदलली जात आहे. यामुळे प्रवाशांवरील टोल कमी होणार आहे. मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, महामार्गावरील शुल्क दोन प्रकारे मोजले जाईल. या दोघांमधून ज्या मोजणीतून कमी टोल लागणार आहे, तो आकारण्यात येणार आहे.

आतापर्यंतच्या नियमांनुसार, बांधकाम असलेल्या मार्गांवर प्रवाशांकडून प्रति किलोमीटर १० पट टोल आकारला जात होता. यामागील उद्देश या महागड्या बांधकामांचा खर्च वसूल करणे होता. परंतु यामुळे प्रवाशांवरील आर्थिक भार वाढत होता. या बदलासंदर्भात बोलताना अधिका-याने सांगितले की, आधी रस्त्यावरील बांधकामाचा जास्त खर्च लक्षात घेऊन १० पट टोल घेतला जात होता. परंतु आता त्यात ५०% पर्यंत सवलत देण्यात आली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »