भुवनेश्वर : News Network
Attack on BMC Commissioner | ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये महानगरपालिका (बीएमसी) आयुक्त रत्नाकर साहू यांच्यावर भाजपा नेत्याच्या समर्थकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

महानगरपालिका आयुक्त रत्नाकर साहू यांना सार्वजनिक तक्रार निवारण बैठकीदरम्यान कार्यालयात काही तरुणांनी बेदम मारहाण केली. सार्वजनिक सुनावणीदरम्यान बीएमसी आयुक्त रत्नाकर साहू यांच्यावर सुमारे पाच ते सहा जणांनी हल्ला केला. काही लोक त्यांच्या चेंबरमध्ये गेले आणि त्यांची कॉलर पकडली. व्हिडिओमध्ये काही जण आयुक्तांना लाथा मारत आणि डोक्यावर हल्ला करताना दिसत आहेत. साहू यांच्यावर भाजपा नेते जगन्नाथ प्रधान यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांना मारहाण केली.
See Video : https://x.com/INCIndia/status/1939681269929103437