khabarbat

A fully electric passenger plane has just covered a distance of 130 kilometers at a cost of just 694 rupees ($8).

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

First electric plane | पहिल्या इलेक्ट्रिक प्रवासी विमानाचे उड्डाण यशस्वी

वॉशिंग्टन : News Network
अमेरिकेतील बीटा टेक्नॉलॉजीज या कंपनीने इतिहास घडवला आहे. त्यांच्या CX 300 या पूर्णपणे इलेक्ट्रिक प्रवासी विमानाने नुकतंच १३० किलोमीटरचं अंतर अवघ्या ६९४ रूपये ($८) खर्चामध्ये पार केलं आहे.

या विमानाने पूर्व हम्प्टन येथून न्युयॉर्कमधील जॉन एफ. केनेडी विमानतळापर्यंत प्रवास केला. या प्रवासात चार प्रवासी उपस्थित होते आणि संपूर्ण उड्डाण अवघ्या ३५ मिनिटांत पूर्ण झालं.

पारंपरिक हेलिकॉप्टरने हेच अंतर पार करण्यासाठी सुमारे रु. १३,८८५ ($१६०) खर्च येतो, मात्र CV 300 ने हा प्रवास केवळ ७०० रुपयांत पार केल्यामुळे हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. यामुळे भविष्यात हवाई प्रवास अधिक स्वस्त, प्रदूषणमुक्त आणि सुलभ होण्याची शक्यता आहे.

बीटा टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि सीईओ काईल क्लार्क यांनी सांगितले की, ‘‘हे १०० टक्के इलेक्ट्रिक विमान आहे. यामध्ये प्रवास करताना आवाजाचा त्रास होत नाही आणि प्रवासी एकमेकांशी निवांतपणे संवाद साधू शकतात. चार्जिंगचा खर्च फक्त $८ आला.’’ ‘सीएक्स ३००’ विमान एका चार्जमध्ये तब्बल २५० नॉटिकल माईल्स म्हणजे जवळपास ४६० किमी अंतर पार करू शकते. त्यामुळे हे विमान शहरांदरम्यान किंवा उपनगरात अल्प अंतरासाठी उपयुक्त ठरणार आहे. लॉस एंजेलिस ऑलिंपिक २०२८ मध्ये अधिकृत एअर टॅक्सी प्रदाता म्हणून आर्चरची निवड झाली आहे. ही वाहतूकप्रणाली २०२६ पासून सुरू होण्याची शक्यता आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »