तेहरान : News Network
इराणने इस्त्रायलच्या हॉस्पिटलवर मिसाईल हल्ला केल्यानंतर आता इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खोमेनी यांना संपविण्याचा इशारा इस्रायलने दिला आहे. अर्धांगवायूने ग्रस्त असले तरी खोमेनी यांनी इराणची सत्ता ताब्यात ठेवली आहे. चार दशकांपूर्वी राजा पहलवीची राजवट उलथवून खोमेनी यांच्या कुटूंबाने इराणवर एकछत्री अंमल ठेवला. खोमेनी हे मुळचे भारतीय असल्याचे सांगितले तर कदाचित आज खरे वाटणार नाही, परंतू हे सत्य आहे.


अयातुल्ला खोमेनी आणि उत्तर प्रदेश यांचे कनेक्शन समोर येत आहे. १९ व्या शतकात खोमेनी यांचे पणजोबा सय्यद अहमद मुसावी यांचा जन्म बाराबंकी जवळच्या किंतूर गावात झाला होता. मुसावी हे १८३० मध्ये किंतूरहून इराणला गेले आणि तिथेच स्थायीक झाले. वयाच्या ४० व्या वर्षी, पणजोबा सय्यद अहमद मुसावी अवधच्या नवाबासोबत तीर्थयात्रेसाठी इराकला गेले होते. इराकहून दोघेही इराणला पोहोचले आणि अहमद मुसावी खोमेन नावाच्या गावात स्थायिक झाले.
भारतातील आहोत हे लोकांच्या लक्षात यावे म्हणून त्यांनी आडनावाला जोडून हिंदी असा शब्द वापरण्यास सुरुवात केली. यानंतर लोक त्यांना सय्यद अहमद मुसावी हिंदी म्हणून ओळखू लागले. पुढे इराणमध्ये मोठी क्रांती घडली. १९७०-८० च्या दशकात इराणचा तत्कालीन राजा मोहम्मद रजा शाह पहलवी याने इराणमधील महिलांना नग्न करून बाजारात उभे करण्यास सुरुवात केली. सैयद यांचा नातू आणि अयातुल्ला अली खोमेनी यांचे वडील रुहोल्ला खोमेनी हे या महिलांचे शरीर कपड्यांनी झाकत असत. ही एक छोटीशी गोष्ट होती पण तिचा खूप दूरगामी परिणाम झाला. रुहोल्ला खोमेनी यांना जनतेचा पाठिंबा मिळत गेला आणि राजाची सत्ता उलथवून टाकण्यात आली.

खोमेनी समर्थनार्थ लोक पेटून उठले, रस्त्यावर उतरले. अखेर घाबरून १६ जानेवारी १९७९ रोजी राजा इराणमधून पळून गेला. १ फेब्रुवारी १९७९ रोजी अयातुल्ला खोमेनी १४ वर्षांनी इराणला पोहोचले. ११ फेब्रुवारी १९७९ रोजी इराणमध्ये इस्लामिक सरकार स्थापन झाले. रुहोल्ला खोमेनीना इराणचे पहिले सर्वोच्च नेते घोषित करण्यात आले. त्यांचा वारसा आताच्या अयातुल्लांकडे आला. इराणच्या इस्लामिक क्रांतीने संपूर्ण इराण बदलून टाकले. पण अयातुल्लाह रुहोल्ला खोमेनी यांनी जो विचार केला होता ते तसे घडले नाही. इस्लामिक क्रांतीमुळे संपूर्ण इराण धार्मिक बनला आणि संपूर्ण मध्य पूर्वेत एकाकी पडला.