khabarbat

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Taipei Athlete | १०५ वर्षाच्या पणजोबाचा अनोखा विक्रम; ४ Gold Medal मिळवून ठरला जगज्जेता!

तैपेई : News Network
थायलंडच्या तैपेई येथे झालेल्या वर्ल्ड मास्टर्स गेममध्ये एक नाही, दोन नाही, तब्बल चार सुवर्णपदकं स्वत:च्या नावावर नोंदवण्याचं एक अनोखा विक्रम १०५ वर्ष वयाच्या तरूणाने केला. त्यांचे नाव सवांग जनप्राम असे आहे.

वयाची शंभरी गाठल्यानंतरही कार्यरत राहणे, मैदानावर असणे आणि जगज्जेतेपद मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळेच सध्या या ज्येष्ठ तरुणाचे अख्ख्या जगात कौतुक होत आहे.

A 105-year-old man has set a unique record of winning as many as four gold medals. His name is Sawang Janapram.
A 105-year-old man has set a unique record of winning as many as four gold medals. His name is Sawang Janapram.

सवांग यांनी शंभर मीटर धावणे, गोळाफेक, भालाफेक आणि थाळीफेक या स्पर्धांमध्ये भाग घेतला. शंभर मीटर धावण्याची स्पर्धा तर त्यांनी स्पर्धात्मक वेळेत म्हणजे ३८.५५ सेकंदांत पूर्ण केली! आयुष्यभर ते कार्यरत असले तरी मुळात या स्पर्धात्मक जगात त्यांनी पाऊल ठेवलं, तेच मुळी वयाच्या नव्वदीनंतर! वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स स्पर्धांत त्यांनी आतापर्यंत साठपेक्षा जास्त पदकं मिळवलेली आहेत!

A 105-year-old man has set a unique record of winning as many as four gold medals. His name is Sawang Janapram.या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे २०२४ ला झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जेवढ्या अ‍ॅथलिट्सनी भाग घेतला होता, त्याच्या दुपटीपेक्षाही जास्त अ‍ॅथलिट या स्पर्धेत सहभागी झाले होते. २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये साधारण १०,५०० अ‍ॅथलिट सहभागी झाले होते, तैपेईमध्ये झालेल्या वर्ल्ड मास्टर्स गेममध्ये सहभागी अ‍ॅथलिट्सची संख्या होती २५,९५० आणि सहभागी झालेले देश होते १०७!

सवांग यांना पाच मुले असून नातू, पणतू, खापरपणतूंचे ते धनी आहेत. सवांग म्हणतात, ‘माझी मुलगी आंतरराष्ट्रीय दर्जाची अ‍ॅथलिट आहे, त्यांची ७३ वर्षीय मुलगी सिरीपान हीदेखील उत्तम खेळाडू आहे आणि तिनेही याच स्पर्धेत तीन सुवर्णपदकं पटकावली!

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »