लखनौ : News Network
नरभक्षक राजा कोलंदर आणि त्याचा मेव्हणा बच्छराज कोल या दोघांच्या कृत्येने देश हादरला होता. दोघांनी माणुसकीला काळिमा फासली. हे दोघे खून करायचे. नंतर तो मानवी मृतदेह खायचे. मृतदेहाच्या डोक्याचे सूप करून प्यायचे. या सीरीयल किलर, नरभक्षक कोलंदरला मानवाच्या खोपड्या, कवट्या जमा करण्याचे पण व्यसन होते. त्याने १४ जणांना मारल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील न्यायालयाने सीरिअल किलर, नरभक्षक राजा कोलंदर आणि बच्छराज कोल या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

राजा कोलंदर आणि बच्छराज कोल या दोघांनी २००० मध्ये २२ वर्षीय मनोज कुमार सिंह आणि चालक रवी श्रीवास्तव यांचे अपहरण केले होते आणि त्यांची हत्या केली होती. हे दोघे २४ जानेवारी २००० रोजी लखनऊ येथून रीवा येथे जाण्यासाठी निघाले होते. रायबरेलीमधील हरचंद्रपूर येथील एका चहाच्या ठिकाणी ते शेवटचे थांबले होते. त्यानंतर तिथून ते गायब झाले. त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.
हे पण वाचा… Immortal Human | नॅनोरोबोट्सच्या मदतीने माणूस अमर होईल…
पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला. त्यांचे छिन्न-विछिन्न मृतदेह प्रयागराज येथील शंकरगडच्या जंगलात सापडले होते. या खूनामागे राजा कोलंदर आणि कोल असल्याचे समोर आले. २५ वर्षांपूर्वी पोलिसांनी दोघांविरोधात दुहेरी हत्याकांडात गुन्हा नोंदवला होता. २१ मार्च २००१ मध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. पण कायदेशीर प्रक्रियेतील अडचणी वाढल्याने या प्रकरणाची सुनावणी २०१३ मध्ये सुरू झाली होती.