khabarbat

There was talk that many jobs would be lost due to AI. A few days ago, Microsoft made a big decision and laid off 6,000 people.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

IT Engineers laid off | AI मुळे Microsoft चे ६००० कर्मचारी बेरोजगार

वॉशिंग्टन : News Network
सध्या जगभरात AI ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. AI मुळे अनेकांची कामे सोपी झाली आहेत. पण AI मुळे अनेकांच्या नोक-या जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. काही दिवसापूर्वी मायक्रोसॉफ्टने मोठा निर्णय घेत ६,००० जणांना नोकरीवरून कमी केले. यामध्ये मोठ्या संख्येने सॉफ्टवेअर अभियंते बळी ठरले आहेत. एका अहवालानुसार, वॉशिंग्टनमधील कर्मचा-यांच्या कपातीमध्ये ४० टक्के कर्मचारी हे सॉफ्टवेअर अभियंते आहेत.

मायक्रोसॉफ्टचे उपाध्यक्ष जेफ हुल्से यांनी त्यांच्या टीमला ५० टक्के कोड जनरेट करण्यासाठी ओपन एआय पॉवर्ड चॅटबॉट वापरण्यास सांगितले. त्यांच्या टीममध्ये एकूण ४०० कर्मचारी होते. ज्यावेळी कंपनीने कर्मचारी कमी केले, त्यावेळी यामध्ये सर्वात जास्त एआय वापरणा-यांची संख्या मोठी होती.

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला हे नेहमी ‘एआय’ बाबत उघडपणे बोलतात. अनेक प्रकल्पांमध्ये ‘एआय’ सुमारे दोन तृतीयांश कोड लिहित आहे, असे त्यांनी कबुल केले आहे. ही कपात फक्त ज्यूनिअर कोडरपुरती मर्यादित नाही. उत्पादन व्यवस्थापन आणि तांत्रिक कार्यक्रम व्यवस्थापन यासारखी कामे करणा-यांनाही याचा फटका बसला आहे. या कपातीमध्ये ज्यूनिअर आणि सिनिअर इंजिनिअरांची कपात करण्यात आली आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत चांगली कमाई असूनही कंपनी कर्मचा-यांना कामावरून काढून टाकत आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »