khabarbat

Did Donald Trump mediate in the conflict between India and Pakistan to benefit his family?

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

कौटुंबिक हित, पुत्रप्रेमापोटी ट्रम्पचा भारत-पाकिस्तान युध्दबंदीसाठी आग्रह

अंडरकरंट

– क्रिप्टोची राजधानी बनण्याची पाकची महत्वाकांक्षा

– ट्रम्प पुत्रांची क्रिप्टोकरन्सी कंपनी ‘डब्यूएलएफ’शी पाकिस्तानची भागिदारी

नवी दिल्ली : News Network
पाकिस्तानने अलीकडेच एक क्रिप्टोकरेंसी कंपनी वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल (डब्ल्यूएलएफ) सोबत महत्त्वपूर्ण करार केला आहे. या कंपनीत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबाची ६० टक्के भागीदारी आहे. हा करार अशावेळी झाला जेव्हा ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहचला होता.

या करारामुळे जागतिक स्तरावर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. सर्वात महत्त्वाचा सवाल म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कुटुंबाला फायदा व्हावा यासाठी भारत-पाकिस्तान या दोन्ही देशातील संघर्षात मध्यस्थीची भूमिका निभावली? हा करार पाकिस्तानने घाईगडबडीत केला, पाकिस्तानी क्रिप्टो कौन्सिल आणि डब्ल्यूएलएफ यांच्यात करारावर स्वाक्षरी झाली. या कौन्सिलने नुकतेच बाइनेंसचे फाऊंडर आणि जगातील सर्वात मोठे क्रिप्टो एक्सचेंजचे सीईओ चांगपेंग झाओ यांना त्यांचा सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. कौन्सिलचे उद्दिष्ट पाकिस्तानला दक्षिण आशियात क्रिप्टोची राजधानी बनवणे हे आहे.

क्रिप्टो कौन्सिल फक्त १ महिना जुनी होती, तरीही या करारात ‘डब्ल्यूएलएफ’चे दिग्गज सहभागी होते. त्यात ट्रम्प यांचे गोल्फ बडी स्टीव विटकॉफचा मुलगा जॅकरी विटकॉफ प्रमुख होते. जॅकरी यांना इस्लामाबाद दौ-यात पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सैन्यप्रमुख असीम मुनीर यांनी विशेष सन्मान दिला.

२२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान क्रिप्टो कौन्सिल आणि वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियलने २६ एप्रिलला इस्लामाबादमध्ये एका करारावर सही केली. ज्याचा हेतू पाकिस्तानात ब्लॉकचेन तंत्रज्ञान, स्टेबरकॉइन आणि डिसेंट्रलाइज्ड फायनान्सला चालना देणे हे होते. या कराराला पाकिस्तानी अर्थ मंत्रालयाने डिजिटल विश्वात पाकिस्तानचं जागतिक स्तरावर उचललेलं मोठं पाऊल असल्याचं म्हटलं होते.

‘डब्ल्यूएलएफ’ कंपनीकडून जॅकरी फोल्कमॅन, चेस हेरो आणि जॅकरी विटकॉफ यांचा समावेश होता. इस्लामाबाद दौ-यात पंतप्रधान शहबाज शरीफ, सैन्य प्रमुख असीम मुनीर, उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री हजर होते. अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. या कंपनीत ट्रम्प यांचे चिरंजीव एरिक आणि डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरसोबत जावई जॅरेड कुश्नर यांची भागीदारी आहे. हे सर्व अलीकडच्या काळात जगभरातील फायदेशीर व्यवसायाचा शोध घेतात. व्हाईट हाऊसशी संबंध असल्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर होतो. विटकॉफ न्यूयॉर्कमधील मोठे रिअल इस्टेट कोट्याधीश व्यापारी आहेत.

वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल हे एक डिसेंट्रलाइज्ड फायनान्स प्लॅटफॉर्म आहे, ज्याची ६० टक्के भागीदारी ट्रम्प कुटुंबाशी संलग्न असलेल्या डीटी मार्क्स डेफी एलएलसीजवळ आहे. टोकन विक्रीतून मिळणा-या उत्पन्नाच्या ७५% रक्कम या संस्थेला मिळण्याचा हक्क आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना कंपनीचे चीफ क्रिप्टो अ‍ॅडव्होकेट म्हणून निवडले आहे. तर त्यांचे पुत्र एरिक आणि डोनाल्ड ज्युनियर यांना वेब३ अ‍ॅम्बेसेडर आणि धाकटा मुलगा बॅरॉन यांना डीफाय व्हिजनरी म्हणून सूचीबद्ध केले आहे. एरिक ट्रम्प हे डब्ल्यूएलएफ होल्डको एलएलसीच्या व्यवस्थापक मंडळावर देखील काम करतात.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »